आजरा. प्रतिनिधी.
निर्मिती प्रकाशन प्रकाशित मिलींद यादव लिखित “डोंगरमाथ्यावरील बहुजनांच्या आया” या पुस्तकाचे प्रकाशन आणि “भारतीय संस्कृतीची सत्य कथा” या विषयावर जेष्ठ विचारवंत डॉ . राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान आणि या दोन्ही विषयावर चर्चासत्र आयोजित केलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . राजेंद्र कुंभार ( जेष्ठ विचारवंत ) हे असणार आहेत.
तसेच चर्चासत्रामध्ये सहभाग म्हणून प्रा . राजाभाऊ शिरगुप्पे ( जेष्ठ विचारवंत – लेखक – कलाकार ),
मिलिंद यादव ( चित्रकार व लेखक ) , सुभाष विभुते ( संस्थापक ऋग्वेद मासिक ) संग्राम सावंत ( राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती ) हे सहभागी होणार आहेत .
या कार्यक्रमाची भुमीका व प्रास्ताविक संजय घाटगे ( नेते लोकशाही बचाव समिती ) हे करणार आहेत . प्रमुख उपस्थिती म्हणून अॅड . सुदिप कांबळे ( नेते सत्यशोधक सेक्युलर फ्रंट ) समीर खेडेकर ( संघटक भारतीय मुस्लिम विकास परिषद ) , काशिनाथ मोरे ( कार्याध्यक्ष , आजरा तालुका महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन समिती ) , विजय कांबळे ( आजरा तालुकाध्यक्ष – कास्ट्राईब शिक्षक संघटना ) कविता नाईक ( जिल्हा कोषाध्यक्ष महिला आघाडी कास्ट्राईब शिक्षक संघटना ) शिवाजी गुरव ( नेते धरणग्रस्त चळवळ ) संघर्ष प्रज्ञावंत ( जिल्हा संघटक मुक्ती संघर्ष समिती ) लक्ष्मी कांबळे ( राज्य सदस्या महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन ) अमर कांबळे ( संघटक गावठाणवाढ संघर्ष समिती ) हे रहाणार आहेत. भारतीय संस्कृतीची मांडणी करणेसाठी भारतीय संस्कृतीची सत्य कथा या विषयावर व्याख्यान व डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम व चर्चासत्र रविवार दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी दु . १२.०० वा . विद्यावर्धिनी पत संस्था हॉल , महाजन गल्ली , आजरा , जि . कोल्हापूर येथे सत्यशोधक सेक्युलर फ्रंट , भारतीय मुस्लिम विकास परिषद , महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन समिती , कास्ट्राईब शिक्षक संघटना , परणग्रस्त चळवळ , मुक्ती संघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन , गावठाणवाढ संघर्ष समिती , लोकशाही बचाव समिती या विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे . तरी जनतेला आवाहन करीत आहोत की , या कार्यक्रमाला उपस्थित रहावे . कोविड काळातील सर्व गोष्टींचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करूया असे आवाहन करणेत आले आहे .
अतुल खरात (नेते सत्यशोधक सेक्युलर फ्रंट); राजेंद्र देशमुख (संघटक गावठाणवाढ संघर्ष समिती); सुरेश देशमुख (कास्ट्राईब शिक्षक संघटना); सविता कांबळे (संघटक लोकशाही बचाव समिती); मजीद मुल्ला (भारतीय मुस्लिम विकास परिषद) बाळू कांबळे (संघटक मुक्ती संघर्ष समिती) भिकाजी कांबळे (आजरा तालुका उपाध्यक्ष म . राज्य अं.नि. समिती); रेश्मा कांबळे (जिल्हा लीडर म . राज्य कामगार युनियन)