MPSC आयोगाचा एकतर्फी निर्णय
सरकारला विचारात घेतलं नव्हतं. – मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार
पुणे,. प्रतिनिधी.११ :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यावरून सरकारवर विरोधक आणि पक्षांतर्गत विरोध वाढताना दिसत आहे.दरम्यान, एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर करताना सरकारला विचारात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सरकारला याबाबत कोणतीही कल्पना देखील देण्यात आली नव्हती, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सविस्तर चर्चा करत असून ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.