आजरा. प्रतिनिधी. १०.
आजरा येथे पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांवर आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये योगेश ईराप्पा पाटील ( वय ३२ ), आशिष रमेश सावंत (वय. ३२) रा. आजरा तसेच मल्लिकार्जुन गंगाधर पट्टणशेट्टी वय. २९ रा. संकेश्वर या तीन आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलिस कर्मचारी यांना मारहाण प्रकरणी आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
मंगळवार दि. ९ रोजी रात्री ९.१० च्या. सुमारास आजरा येथील एच.डी.एफ.सी बँकेचे समोरील वाहतुकीची झालेली कोंडी दूर करण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, व प्रशांत चौधरी हे व्यस्त असताना दरम्यान वरील तीन आरोपी एक मोटर सायकल वरून तीन सीट जात असताना या तीन आरोपीनी श्री जाधव व पोलीस कर्मचारी त्यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की करून कपडे फाटेपर्यंत पोलीस कर्मचारी यांना तीन आरोपीनी मारहाण केली असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी आजरा पोलिसात दिली असून या तिघांविरुद्ध आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास स.पो.नि. सुनिल हारुगडे करीत आहेत.