Homeकोंकण - ठाणेभारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी...

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी पक्षनेत्यांच्या केसाला हात तर लावून दाखवा.- डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा

मुंबई, दि. (प्रतिनिधी) :

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.

Previous article
Next article
घरच्यांनी केलेला सन्मान हा पद्म पुरस्कारासमान ; योगेश वसंत त्रिवेदी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली कृतज्ञता. मुंबई, दि. (प्रतिनिधी) माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो. त्यामुळे अंबरनाथकरांनी आज आमचा सन्मान केला हा आम्ही आमच्या घरच्या माणसांनी केलेला सन्मान समजतो आणि घरच्या माणसांनी सन्मान करुन आमच्या पाठीवर कौतुकाची, शाबासकीची मारलेली थाप आणि हा सन्मान हा आम्हाला भारतरत्न, पद्म पुरस्कारासमान निश्चितच वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करुन अंबरनाथ शहराचे नांव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, अंबरनाथ तर्फे आयोजित करण्यात आला होता. कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक विलासराव देसाई, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी सुभाष काळे, मोरेश्वर पटवर्धन, राजेंद्र परोळसांदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना योगेश त्रिवेदी म्हणाले की, सत्कार बरेच होतात, पुरस्कार सुद्धा मिळतात परंतु घरातील आपल्या माणसांनी आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची, शाबासकीची थाप ही मौल्यवान असते त्यामुळे अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेला आमचा सन्मान हा भारतरत्न, पद्म पुरस्कार इतकाच महत्त्वाचा वाटतो. अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे झोमणशेठ अध्यक्ष असतांना मी उपाध्यक्ष होतो आणि पुण्याला महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अधिवेशन होते. कालनिर्णय कार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर हे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे हे कार्याध्यक्ष होते. झोमणशेठ आणि मी अशा आम्ही दोघांनी अंबरनाथचे प्रतिनिधित्व त्या अधिवेशनात करुन गणेशोत्सव साजरा करतांना आपली संस्कृती, परंपरा कशी जतन करावी, याची साग्रसंगीत माहिती जाणून घेत अंबरनाथ मध्ये ती देण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ चे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या पत्रकारितेचा उपयोग करुन घेतला. शिवमंदिर पर्यटन केंद्र करणे असो की कल्याण महानगरपालिका क्षेत्रातून अंबरनाथ वगळण्याचा नऊ वर्षांचा संघर्ष असो, की शिवदर्शन बंगला पुनश्च अंबरनाथ मध्ये आणणे, अंबरनाथ तालुका निर्मिती अशा अनेक महत्वपूर्ण विषयात सहभाग घेतला. एक अंबरनाथकर म्हणून आपण कधीही हाक मारा, मी आणि मुकुंद कुलकर्णी तुमच्या हाकेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काम करीत राहणे हे महत्त्वाचे आहे. टीकाकार टीका करीत राहतील पण आपण ते मार्गदर्शन म्हणून पहायला हवे, लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मुकुंद कुलकर्णी यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष दबडे, पांडुरंग जवादे, हेमलता गांगल, वसुंधरा वझे, सरचिटणीस राजेंद्र परोळसांदे, पदाधिकारी सचिन वैद्य, भगवान सासे, विजयन नायर, गणेश शेटे, ललित बकरे, बाळा दलाल, पौरोहित्य करणारे चंद्रकांत भास्कर कुलकर्णी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. राजेंद्र परोळसांदे यांनी आपल्या भावना पोटतिडकीने मांडून हा ६९ वा उत्सव शतकोत्तर होवो आणि त्यासाठी सर्वांनी हिरीरीने सहकार्य करावे असे आवाहन केले. या महोत्सवात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पूर्णिमा कबरे, हेमंत गोगटे, किसनराव तारमळे, शोभा शेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विशाखा सुभेदार, सिद्धी गंगावणे, पायल कबरे, किरण माने, सुधीर टाकळकर, डॉ. समीर कुलकर्णी, राजेंद्र कर्णिक, शीतल जोशी, मनीषा वाळेकर, डॉ. मनोज कंदोई, प्रदीप ताम्हाणे, सागर जाधव, मोहन कुलकर्णी, अविनाश सुरसे, सुशील दलाल आदी प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.