Homeकोंकण - ठाणेगणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाचं धुमशान सुरुच.- आजही मुंबई, ठाण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट, अनेक...

गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाचं धुमशान सुरुच.- आजही मुंबई, ठाण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता.

मुंबई. प्रतिनिधी.

मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, वेगवेगळ्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू, जवळपास ७०० जनावरं दगावली*श

मुंबईत गणपती मिरवणुकीत दोन डोस घेतलेल्यांनाच सहभागी होता येणार, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

नऊ वर्षाच्या सुखी संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट, आयेशाची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

⭕⭕राज्यभरात पावसाचे थैमानथैमान.
👉मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी!

👉राज्याला काल पावसाने झोडपून काढले. मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली.

👉राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज अतिशय अचूक ठरला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.

👉महापुरातून सावरलेल्या चाळीसगावात पुन्हा जोरदार पावसाने नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर मुंबई, नागपूर, बुलडाणा, जामनेर, लातूर, नाशिक सगळीकडेच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

👉राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस बरसला. त्यामुळे कुठे पिकांना जीवदान मिळालं तर कुठे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला.

👉चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या

  • महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या चाळीसगाव शहरावर पुन्हा नद्या कोपल्या आहेत. चितूर डोंगरी नदीने पुन्हा उग्ररूप धारण केलं असून पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. आता पुराचे पाणी काहीसं ओसरु लागलं असून या पावसाने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

👉जामनेरमध्ये मुसळधार पाऊस

  • जामनेर तालुक्यात चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. तालुक्यातील ओझर-टाकरखेडा-हिंगणे-टाकळी बुद्रुक – हिवरखेडा सह चार ते पाच गावांना चक्रीवादळाचा फटका बसला.

👉औरंगाबादमध्येही मुसळधार पाऊस

  • औरंगाबादच्या फुलंब्री शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून औरंगाबाद जळगाव महामार्गावर गुडगा भर पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती. शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले होते. खुलताबाद फुलंब्री महामार्गावर पाणीच पाणी झाले असून दुकानात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.

👉मुंबईमध्ये पावसाची हजेरी.

  • मुंबईत काल सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. थोड्या-थोड्या वेळाच्या विश्रांतीने मुंबईत काल तुफान पाऊस पडला. संध्याकाळी 6 नंतर पावसाने आक्रमक रुप धारण केलं. सायंकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.