नवी दिल्ली :-वृतसंस्था.
भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत करत मालिकेत २-१ आघाडी घेतली आहे. ओव्हल मैदानावरील या विजयाची भारत ५० वर्षांपासून वाट पाहत होता. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे ट्वीट करत अभिनंदन केले आहे. हा विजय आणि देशातील लसीकरण मोहीम याची सांगड घालत त्यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
देशात कोरोना लसीकरण मोहीमेत भारताने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या ओव्हर मैदानात इतिहास रचला आहे. या दोन्ही कामगिरी एकत्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.”लसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणे..भारत जिंकला”, असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना व्हॅक्सिन मोफत व्हॅक्सिन असा हॅशटॅग टाकला आहे. सोमवारी दिवसभरात १ कोटीहून अधिक जणांना लस देण्याचा विक्रम केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भारताने गेल्या ११ दिवसात तिसऱ्यांदा असा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात आतापर्यंत ६९.६८ कोटी लोकांचे लसीकरण केले आहे.
पहिल्या डावात भारताने १९१ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या डावात भारताने ४६६ धावांचा डोंगर रचला. तसेच इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने पहिल्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली होती. बर्न्सने ५० आणि हमीदने ६३ धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. भारताकडून उमेश यादवने ३, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ गडी बाद केले.
फलंदाजांनीही केली अप्रतिम कामगिरी
या सामन्याच्या पहिल्या डावात, जिथे भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप होते, दुसऱ्या डावात सर्वांनी चमत्कार केले. संघाचा हिटमन सलामीवीर रोहित शर्माने १२७ धावांचे शानदार शतक झळकावले. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची खेळी खेळली. याशिवाय रिषभ पंतने ५० आणि शार्दुल ठाकूरने ६० धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीने ४२ धावांची खेळी खेळली. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर टीम इंडिया दुसऱ्या डावात ४६६ धावा करू शकली.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात, टीम रोहित पुजारा व्यतिरिक्त, कोहलीनेही ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि पंतने डाव सावरत शतकी भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने ६० तर पंतने ५० धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने ३८७ धावांची आघाडी घेतली.
