संजय राठोड राजीनामा देणार?.- शिवसेना नेते संजय राऊतांचं सूचक ट्विट.
मुंबई प्रतिनिधी.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चेनं राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं बोललं जात असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
