Homeकोंकण - ठाणेनारायण राणे जेवत होते, पण पोलिसांनी ना जेवणाचं ताट खेचलं, ना धक्काबुक्की....

नारायण राणे जेवत होते, पण पोलिसांनी ना जेवणाचं ताट खेचलं, ना धक्काबुक्की. प्रसाद लाड यांचा माध्यमांकडे बनाव?

रत्नागिरी, २४ ऑगस्ट:-

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.त्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांना एक व्हिडिओ दाखवताना पोलिसांनी नारायण राणे जेवत असताना त्यांच्या हातातील ताट ओढून घेतलं आणि नारायण राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. मात्र व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्यात तथ्य नाही असंच म्हणावं लागेल.

प्रसाद लाड यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय:-

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हातात ताट घेऊन जेवताना दिसत आहेत. समोर पोलीसांची टीम असून नारायण राणे आणि पोलिसांच्या टीमच्या मध्ये निलेश राणे, नितेश राणे आणि काही पदाधिकारी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. तर नारायण राणे हातातील ताट हातातच ठेऊन उभे राहून पोलिसांची वाद घालत असल्याचं दिसतंय. मात्र संबंधित व्हिडिओमध्ये कुठे नारायण राणे यांना धक्काबुक्की किंवा हातातील जेवणाचं ताट पोलिसांनी हुसकावून घेतल्याचं पाहायला मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओतील सोयीस्कर रेकॉर्डिंग प्रसार माध्यमांकडे चुकीच्या पद्धतीने भाजपचे आमदार प्रसाद लाड मांडत असल्याचं व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट दिसतंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.