Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपक्षप्रमुख उद्धव ठाकरे - मनसे अध्यक्ष.- राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तब्बल चार...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे – मनसे अध्यक्ष.- राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तब्बल चार तास खलबतं- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे – मनसे अध्यक्ष.- राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तब्बल चार तास खलबतं- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा.

मुंबई.- प्रतिनिधी.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युत्या तर काही ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत. तर कुठं स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही महानगरपालिकांमध्ये काहीजण बिनविरोध देखील निवडून गेले आहेत. दरम्यान, मुंबईत महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. यामध्ये तब्बल ४ तास खलबतं झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज तब्बल चार तास चर्चा झाली आहे. या चार तासात वचननामा, सभा, रॅली आणि निवडणूक प्रचार गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने ठाकरेंच्या युतीत जर कोणी बंडखोर असतील तर त्याकडे स्थानिक पातळीवर लक्ष देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 164 जागांवर आणि मनसे 53 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन महायुती आणि काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या युतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश झाला असून,मनसेने आपल्या वाट्याला आलेल्या 53 जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रणनिती आखण्यासाठी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास चार तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान कोणत्या ठिकाणी दोघांच्या संयुक्त सभा घ्यायच्या आणि कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घ्यायच्या यावर सविस्तर चर्चा झाली अशीदेखील माहिती मिळत आहे.

मुंबईसाठी कसा वचननामा असणार? मुंबईकरांना काय द्यायचं आणि विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी कशा प्रकारचा वचननामा बनवायचा यावर चर्चा अंतिम टप्प्यात पार पडली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेवटची संयुक्त सभा शिवाजी पार्क येथे घेण्याचं ठरलं आहे. या बैठकीत निवडणूक प्रचार गीतासंदर्भातही चर्चा झाली आहे. एकंदरीत प्रचाराची तीन तारखेपासून खरी सुरुवात होणार आहे, त्याची पूर्ण रणनीती आज या चार तासात आखली गेली असल्याचे समजत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.