🛑आजरा. नगरपंचायत.- सर्वर डाऊन – उमेदवारी अर्ज संख्या निरंक..
🛑नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.- निवडणूक कर्मचारी त्यांच्याशी – सूचना बैठक.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत निवडणूक रणधुमाळीत आज दि. १० रोजी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता.
पण काही उमेदवार अर्ज दाखल करण्याच्यादृष्टीने कागदपत्रासह तयारीत असताना सर्वर डाऊन मुळे ऑनलाइन अर्ज दाखल करता आला नाही.
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहेत परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे आजचा पहिला दिवस आहे. उद्या भरता येईल परंतु सततच्या सर्व डाऊन या प्रक्रियेला शासन काय मार्ग काढणार ऑफलाईन अर्ज देखील घेतले जाणार आहेत परंतु ऑनलाईन अर्ज अपलोड नाही झाल्यास याला जबाबदार कोण शासन निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये एखादा उमेदवार सर्वर डाऊन मुळे अर्ज ऑनलाईन करूनही शकला तर
यासाठी निवडणूक विभागाकडून सर्वर बाबत नोंद घेऊन ऑफलाईन अर्ज घेण्यात यावा.
याबाबत विचार व्हावा अशी मागणी होत आहे.

💥चौकट.
🟣नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.- निवडणूक कर्मचारी त्यांच्याशी – सूचना बैठक.
आजरा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी म्हणून काम करणारे शासकीय कर्मचारी यांच्याशी निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सूचना , अधिनियमाच्या बाबत बैठक संपन्न होऊन याबाबतचे मार्गदर्शन तहसीलदार श्रीमाने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सर्व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.

