दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनता बँक आजराकडे एका दिवसात तब्बल रु. १२ कोटी ४१ लाखाच्या ठेवी जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्यानिमित्य एका दिवसात तब्बल रु. १२ कोटी ४१ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
याचाच अर्थ सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास व बँकेबद्दल असलेली अस्मियता दिसून येते.
बँकेने आज पर्यंत अनेक यशाची शिखरे पार करत जिल्हयात तसेच देशात सर्वोकृष्ट बँक, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक सतत १० वर्ष पुरस्कार प्राप्त केले आहेत. बँकेने घरबांधणी करिता सावली गृहकर्ज योजना, कार लोन ९% व्याजदराने सुरू केली आहे. तसेच इतर सर्व कर्जे ११.५०% व्याजदराने कमीत कमी कागदपत्र, कोणतेही हिडन चार्जेस न घेता सर्व शाखांमधून सुरू करणेत आल्या आहेत.
बँकेने सर्व अद्यावत टेक्नॉलोजी सर्व्हस चालू केली असून बँकेने यु.पी.आय., गुगल पे, फोन पे, क्यु आर कोड, भिम इ. सेवा चालू करुन ग्राहकांना त्वरीत पेर्मेन्ट करणेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. बँकेकडे रू. ४६० कोटी ठेवी व रू. २७८ कोटी कर्जे, एकूण बँकेचा मिश्र व्यवसाय ७३८ कोटी इतका आहे. बँकेचा ऑडिट वर्ग सतत “अ” आहे.
तसेच रू. ५७ कोटी इतके स्वभांडवल असून बँकेने एकूण रू. २१३ कोटी गुंतवणूक असून एन.पी.ए. ०% राखून बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आर्थिक दृष्ट्या सक्षम व सुनियोजित व्यवस्थापन (FSWM) हा निकष पूर्ण केला आहे. मार्च २०२६ पर्यंत ५०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प आहे, असे बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी सांगितले.
बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त विकास महामंडळ यांची परतावा कर्ज योजना, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व्याज परतावा कर्ज योजना व पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFE) मार्फत दिल्या जाणाऱ्या रु. १० लाखापर्यंतची सबसिडीची कर्ज देवून तरुण उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करत आहे.
तसेच बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकेला नवीन शाखा गारगोटी चालू करणेची मंजूरी दिली असून शाखेचे संपूर्ण फर्निचरचे कामकाज पुर्ण झाले असून दि. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी शाखा गारगोटी सुरू करीत आहोत, असे बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई व बँकेचे सीईओ एम.बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यासोबत बँकेचे सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
