आजरा येथे गिरणी कामगार संघटनेची बैठक संपन्न.( संघटनेच्या विरोधात काम करणारे गिरणी कामगारांना संघटनेतून केले बाहेर )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे गिरणीकामगार संघटना कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत प्रत्येक गावातील अध्यक्षांची उपस्थिती होती. बैठकीत संघटनेच्या विरोधात काम करणारे गिरणीकामगार आबा पाटील, जानबा धडाम, दादु मोकाशी व काका देसाई यांना संघटने मधून काढण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून सर्व श्रमिक संघटने बरोबर असणाऱ्या कोणीही कामगारांनी त्यांच्याशी संपर्क करू नये. त्यांच्या सोबत असणाऱ्यांचे नुकसान झालेस, संघटना जबाबदार राहणार नाही.
तसेच शासनाने काढलेला
१५ मार्च २०२४ रोजीचा जी आर ताबडतोब रद्द करा. गिरणी कामगारांना मुंबई मध्ये मोफत घर देऊन पुनर्वसन करा.
वांगणी सेलू येथील घरांचा विरोध करा येणाऱ्या काळात सर्व पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सह गिरणी कामगार वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .