आजरा अर्बन बँकेचा व्यवसायाचा १६०० कोटींचा टप्पा पार. – बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा अर्बन बँकेने या आर्थिक वर्षात रु. १००० कोटीच्या ठेवी बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या
सहकार्याने पूर्ण झाल्या आहेत. बँकेने गतवर्षी पेक्षा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रु.१२६ कोटी ६६ लाखाने ठेवीमध्ये वाढ केली
असून एकूण रु. १०२५ कोटी ठेवीचा टप्पा पार केला. असून एकूण मिश्र व्यवसाय १६८१ कोटी ५२ लाख इतका झाला आहे. याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण हे शून्य टक्के राखण्यात यश मिळवले असून ढोबळ NPA चे प्रमाण ३.११ टक्के इतके राहिले आहे.

बँकेने सर्व आवश्यक वैधानिक तरतुदी पूर्ण करून बँकेचा एकूण ढोबळ नफा ९ कोटी ८२ लाख इतका झाला आहे. हे बँकेचे यश
सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचारी यांना समर्पित आहे.
रिझर्व्ह बँकेने तीन नवीन शाखा उघडणेसाठीचा प्रस्तावास मंजूरी दिली होती त्याप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये शाखा बेळगुंदी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कल्याण (मुंबई) व फुलेवाडी (कोल्हापूर) येथे शाखा सुरू केल्या आहेत. अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८५० कोटी च्या वरील बँक) जिल्हा स्तरावरील सलग चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले तसेच सातत्याने विविध नवीन योजना आपल्या सभासद आणि ग्राहकांच्या सेवेसाठी संचालक मंडळ नेहमीच प्राधान्याने उपक्रम राबवत आहेत. बँकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या आहेत. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे मत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केले. यापुढे बँकेने शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करणेचे ध्येय निश्चित केले असून त्याप्रमाणे बँकेची घोडदौड चालू असलेचे प्रतिपादन केले. बँकेच्या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकेची प्रगती होऊ शकते असे मत बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायासाठी तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देखील बँकेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प ज्येष्ठ संचालिका श्रीमती अन्नपूर्णा चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनिल मगदूम, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केला आहे. यावेळी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर व सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.