पावसामुळे चेंबुरमध्ये दरड कोसळुन ११ जनाचा मृत्यू…
मुंबई प्रतिनिधी.
मुसळधार पावसामुळे चेंबुरमध्ये दरड कोसळुन ११ जनाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली.