कुमारी अन्वि चेतन घाटगे हिच्या.- वाढदिवसानिमित्त ६०० वृक्षांची ग्रामपंचायतला दिली भेट.
【 पोलीस कुटुंबातील कन्येचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा.】
हातकनगले. प्रतिनिधी.१५
आजरा पोलीस ठाणे मध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक चेतन घाटगे व त्यांच्या पत्नी अनिता घाटगे यांनी आपली मुलगी कुमारी अन्वि हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत ग्रामपंचायत नेजला तालुका हातकलंगले ६०० विविध प्रकारचे झाडे भेट देऊन साजरा केला .
कार्यक्रमांमध्ये चेतन घाटगे यांनी
जागतिकीकरण,आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यातूनच वाढत असलेले जागतिक तापमान यामुळे ढासळत असलेला पर्यावरणाचा समतोल, त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे की,एक तरी झाडं लावणे आणि ते जगवणे.
आणि याच विचारातून विचाराधीन असलेल्या
सदरचे या उपक्रमांमध्ये वड ,पिंपळ, चिंच, जांभळ, आवळा, शिशु, बांबू ,करंज, तुती, शिवन ,हेळा, चारोळी, दालचिनी, गुलमोहर, अशी विविध प्रकारची पर्यावरण राखणारे व आर्थिक उत्पन्न देणारी झाडे दिली आहेत
सदरचे झाडे आपल्या भागात जगणारे व कमी पाण्यात येणारे त्याहूनही महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न देणारी अशी निवडण्यात आलेले आहेत . ज्या गावकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर ,अगर दारामध्ये अगर परड्या मध्ये वैयक्तिकरित्या झाडे लावायचे आहेत असे गावकरी तसेच गावातील मंडळांनी, आपापल्या गल्लीमध्ये, सार्वजनिक जागेमध्ये जसे की, पाणंद, प्राथमिक शाळा, तलाव, रस्त्याचे दुतर्फा, कबरस्तान मंडळाच्या माध्यमातून लावायचे आहेत अशी मंडळे
या उपक्रमांमध्ये भाग घेऊन शकतात असे म्हणाले असून दिपाली गोंधळी सरपंच व मनोज कांबळे उपसरपंच, अमोल चव्हाण सदस्य ग्रामपंचायत यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला कोरोना महामारी सारखे व इतर व्याधी यासाठी ग्रामपंचायत तसेच गावातील नागरिकांनी ठरवले तर आपल्या गावामध्ये एक ऑक्सीजन पार्क ची निर्मिती होऊ शकते असे मनोज कांबळे उपसरपंच म्हणाले.
वृक्ष भेट चा कार्यक्रम आज दिनांक १५ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय नेज येथे संपन्न झाला.सदर उपक्रमांमध्ये वनरक्षक डेळेकर यांचे योगदान लाभल्याचे अनिता घाटगे यांनी सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपाली गोंधळे सरपंच नेज, प्रमुख पाहुणे समीर कांबळे, कोल्हापूर पोलीस,तसेच
प्रमुख उपस्थिती मनोज कांबळे उपसरपंच नेज
अमोल चव्हाण सदस्य ग्रामपंचायत नेज,
ग्रामसेवक खोत मॅडम
तसेच दिलीप घाटगे ,रोहित घाटगे, राजू कलातने ,लॉरेन्स घाटगे ,राजू दरवेशी , ग्रामपंचायत कर्मचारी व नेज गावचे नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते .
प्रस्तावना रोहित घाटगे तर आभार ग्रामसेवक खोत यांनी मानले