आजरा मसोलीत अज्ञात चोरट्यांनी केली घरपोडी.- घरफोडीचा सुळसुळाट. ( ४ लाख ४० हजारांची चोरी.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील महसुली येथे अज्ञात चोरट्याने घरपोडी केली असली बाबतची फिर्याद संभाजी गुंडु गुरव रा. मसोली, ता. आजरा यांनी आजरा पोलिसात दिली आहे. यामध्ये अज्ञात चोरट्याने फिर्यादी तसेच तानाजी चंद्रकांत पोवार यांचे बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन त्यांचे घरातील तिजोरी उचकटुन त्यातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले असुन शिवाजी आप्पा गुरव यांचे बंद घराचे कुलूप तोडुन त्यांचे घरात चोरी करण्याच्या प्रयत्न केला असलेबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये चोरीला गेलेला गेला माल – 1,20,000/- रु किंमतीचा 20 ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार जु.वा.कि.स., 75,000/- रु किंमतीची 12.50 ग्रॅम वजनाची एक बोर माळ जु.वा.कि.स., 75,000/- रु किंमतीचे 12.50 ग्रॅम वजनाचे काळे मनी व सोन्याची मणी असलेले गंठण जु.वा.कि.स.
24,000/- रु किंमतीचे 4 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी त्यामध्ये लाल रंगाचा खडा असलेली जु.वा.कि.स., 5000/- रु किंमतीचे चांदीचे तीन छल्ले व एक पैंजन जोड अंदाजे 20 तोळे वजनाचे जु.वा.कि.स., 45,000/- रु रोख रक्कम त्यात 500 व 100 रु भारतीय चलनी नोटा मि.कि.स., 60,000/- रु किंमतीची 10 ग्रॅम वजनाचे लहान मुलांचे गळ्यातील सोन्याची चैन जु.वा.कि.स.
असा एकूण 4,04,,000. तानाजी चंद्रकांत पोवार यांचा गेला माल –
30,000/-रू किंमतीचे दिड किलो वजनाचे लहान मुलाचे बारश्यामध्ये आलेले चांदीचे दागिने त्यामध्ये वाळे, पैंजण, करदोळे, बिंदल्या, हातातील कडे मि.कि.स, 6000/- रु रोख रक्कम त्यात 100 व 50 रुपये दराच्या चलणी भारतीय नोटा मि.कि.स. एकुण 36,000/- अशी चोरी झाली आहे. अधिक तपास दाखल अंमलदार – पो बेनके, तपासी अंमलदार पो.स.ई. एस.एन.पाटील करत आहेत.