माजी. आम. .दिनकरराव सरकारददा..एक आदर्श व्यक्तिमत्व
( जीवनगाथा…….)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
राधानगरी विधानसभेचे माजी आमदार मौनी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेदगंगा काठी वसलेलं तिरवडे गावात माजी आम. दिनकरराव जाधव यांचा जन्म झाला. भुदरगड तालुक्यात १९५६ पासून आजतागायत कॉंग्रेसचे एकनिष्ट कार्यकर्ते ते नेते असा त्यांचा अखंड प्रवास राहिला .
दिनकरराव जाधव(सरकार दादा) यांनी १९५३ ला राजाराम कॉलेज मधील शिक्षण पूर्ण करून गावी वडिलोपार्जीत शेती आणि समाजकारण करण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काका श्रीमान नारायणराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेती आणि समाजकारणाचे बाळकडू दादांना घरीच मिळाले. दादांचे घराणे सात्विक विचाराचे त्यामुळे त्यांच्या लहानपनापासूनच त्यांच्यावर सात्विक सहनशीलता आनंदी हसतमुखजीवनाचे विचार मनामध्ये नोंद केलेले त्यांच्या जडणघडणीमध्ये अध्यात्माचा वास असल्याची प्रचीती आपल्याला क्षणोक्षणी पहायला मिळते. गर्भश्रीमंत असूनही दादांनी आपल्या सामाजिक जिवनात कधीही त्यांचे सादरीकरण केले नाही दादांचे राहणीमान साधे उच्च विचार सरणी आपल्याला पहावयास मिळते.
पुढे १९५६ साली कडगांव व तिरवडे गावच्या सरपंचपदी दादांची निवड झाली यावेळेपासून दादांच्या सामाजिक,राजकीय कार्याची सुरुवात झाली पुढे दादा शेतामध्ये गुठ्यावर व्यस्त असताना बी.जी.देसाई, आनंदराव मोरे, बी.डी.देसाई व सहकारी आणि तालुक्यातील सहकारातील काम करणारे कार्यकर्ते शेताच्या बांधावर जाऊन दादांनी तालुका संघाच्या निवडणुकीचा अर्ज भरला व दादा तालुका संघाचे संचालक म्हणून निवडून आले आणि आणि भुदरगडचे सभापती, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक या सर्व सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये काम करीत असताना शेतकरी पददलित, कष्टकरी जनतेला आपल्या आपल्या पदाचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल याचा सदैव दादांनी विचार केला.आपण केलेल्या कार्याची पोष्टरबाजी दादांनी कधीही केलेली नाही प्रसिद्धी पासून दूर राहून विकास कामना गती देण्यास दादा व्यस्त राहत.
दादांना १९७८ मध्ये विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी मिळाली आणि विजयी झाले. दादा विधिमंडळाचे सदस्य झाले दादांच्या कार्याला बळकटी निर्माण झाली. विधीमंडळात अल्पावधीतच दादांच्या कामाची दखल घ्यावी लागली. १९८० च्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील १४ तळ्यांना महापूर आले अनेक लोकांची, घरे, शेती, जनावरे यांची मोठ्या प्रमाणात हाणी झाली तेव्हा विधिमंडळामध्ये चर्चेत भाग घेताना दादांनी सर्व सभाग्रहाला आपल्या अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या व्यथा सरकारदरबारी लावून धरल्या आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांचा मोबदला मिळवून दिला. सरकारी मदत वाडीवस्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी पायी पाच पाच किलोमीटर अंतर चालत जाऊन मदत केली. पुढे विधानसभा बरखास्त झालेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन वसंतदादा पाटील (मुख्यमत्री) यांनी दादांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली.
दादा विधानपरिषदेत काम करीत असताना कोकण रेल्वे, कोकणाला जोडणारे भुदरगड तालुक्यातील रस्ते, तळपाणी योजना, वीज, विविध पतसंस्था, सेवासंस्था यांची निर्मिती केली. पुढे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत असताना पाटगाव, काळांमवाडी इत्यादी प्रकल्प निर्माण व्हावेत व आपल्या शेतकरी बांधवाना बारमाही पाण्याची शेती करता यावी यासाठी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला व शेतकऱ्याचा उसाला योग्य भाव मिळावा, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लढविली व जिंकली दादा चेअरमन झाल्यानंतर कारखान्याचे आपण विश्वस्त आहोत मालक नाही याची जाणीव आपण आणि आपल्या सहकाऱ्यांना दादा नेहमी करत कारखाना कर्जमुक्त करून सभासद,कामगार यांचा बोनस उसाला जड दर मिळवून दिला.
दादांनी चार तालुक्यातील गोरगरीब जनतेचा कारखाना आहे हा सहकारी आहे तो सहकारीच राहिला पाहिजे असा स्वछ पारदर्शी कारभार दादांनी केला म्हणूनच वयाच्या 86 व्या वर्षी दादा शिवडाव-सोनवडे घात रस्त्याची पाहणी दौऱ्यामध्ये विनाकाठी, विनासोबाती स्वतः पायी दोनदोन तास प्रवास करण्याची क्षमता पाहायला मिळते.
दादांनी वेसर्डे ते चीवले रस्ता, नितवडे ते वाकीघोल रस्ता, कडगांव ते आजरा तसेच ६४ गावांना सायपण पद्धतीच्या पिण्याच्या पाण्याच्या त्या काळात दादांनी केल्या. शिवडाव-सोनवडे घाटाची मुळ कल्पना दादांची होती, पारंपारिक काँग्रेस विचारांबरोबर आधुनिकतेची कासधरत शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी वसंतदादा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून कडगाव पंचक्रोशी शिक्षणाची द्वारे जनसामान्यांसाठी खुली केली. आधुनिक काळात साखर उद्योगाबरोबर इइथेनॉल चे महत्व ओळखून दिनकरराव जाधव LLP लि. च्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचा महत्वकांक्षी प्रकल्प त्यांनी सुरू केला. असा दूरदृष्टीला आसलेला सर्वसामान्यांचे नेतृत्व असणारा महामेरू आपल्यातून हरवला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..