Homeकोंकण - ठाणेमुंबईत फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला, - ४० जणांना वाचवण्यात यश.

मुंबईत फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला, – ४० जणांना वाचवण्यात यश.


मुंबईत फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला, – ४० जणांना वाचवण्यात यश

मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. यात आतापर्यंत ४० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली इमारतीचा आतील स्लॅब कोसळला आहे.यात काही जण अडकल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचं सांगण्यात येत आहे. याठिकाणी इमारतीचं दुरूस्तीचं काम सुरू होतं आणि काही मजूर देखील इथंच राहत होते. इमारतीची आतील बाजूनं डागडुजी सुरू होती. त्याच ठिकाणी पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.