Homeकोंकण - ठाणेपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा.【४०० वर्षापुर्वीच्या वटवृक्षाचा साजरा...

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा.【४०० वर्षापुर्वीच्या वटवृक्षाचा साजरा केला वाढदिवस. 】

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा.【४०० वर्षापुर्वीच्या वटवृक्षाचा साजरा केला वाढदिवस. 】

आजरा. प्रतिनिधी. १६.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चारशे वर्षांपूर्वीच्या वडाचा वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजरा शिरसिंगी येथील चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड असून या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून पुढे येत आहे. माजी मंत्री कै. बाबासाहेब कुपेकर यांनी पर्यटन स्थळांसाठी प्रयत्न करून ‘क’ वर्ग दर्जा दिला होता. नंतरच्या काळात माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “आड वाटेवचे गाव” असे नाव दिले होते परंतु प्रत्यक्षात इतकं मोठं वडाचे वृक्ष महाराष्ट्रात पाहायला मिळते या ठिकाणी पर्यटन स्थळ होण्यासाठी मागणी होत असताना म्हणावे इतके प्रयत्न झाले नसल्याचे बोलले जाते.
हे वटवृक्ष चारशे वर्षापूर्वी असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
शिवसेना नेते युवा सेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन व राज्य शिष्टाचार मधले ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुक्यातील शिरसिंगी येथील ४०० वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संघटक संग्राम कुपेकर, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक दिनेश कुंभीरकर, प्रतीक क्षीरसागर, बाबुराव नाईक, वसंत सुतार, पांडुरंग टकेकर, शशिकांत देसाई, मारुती मळेकर, सर्जेराव कांबळे, मधुकर कुंभार, उत्तम बुगडे, यांच्यासह शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच सरपंच संदीप चौगले, सी आर देसाई सर दिगंबर देसाई, महादेव कुडव, संंतोष चौगुले सह शिरसिंगी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा उपक्रम साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.