Homeकोंकण - ठाणेमुंबई - गोवा महामार्गावर तुरळ जवळील भीषण अपघातात २१ वर्षीय विघ्नेश करंडेचा...

मुंबई – गोवा महामार्गावर तुरळ जवळील भीषण अपघातात २१ वर्षीय विघ्नेश करंडेचा दुर्दैवी मृत्यू ( बोलेरोची मोटर सायकलला धडक बसल्याने विघ्नेशचा जागीच मृत्यू.)🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप बंदच.- पोर्टल सुरु होण्याची प्रतिक्षा.

🛑मुंबई – गोवा महामार्गावर तुरळ जवळील भीषण अपघातात २१ वर्षीय विघ्नेश करंडेचा दुर्दैवी मृत्यू ( बोलेरोची मोटर सायकलला धडक बसल्याने विघ्नेशचा जागीच मृत्यू.)
🛑मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप बंदच.- पोर्टल सुरु होण्याची प्रतिक्षा.

संगमेश्वर :- प्रतिनिधी.

मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तूरळ हरेकरवाडी येथे बोलेरो पिक – अप आणि दुचाकी मधे भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बोलेरो चालक व त्यातील अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.ही घटना आज सकाळी साडे अकरा च्या सुमारास घडली.
धामणी पेट्रोल पंपावर काम करणारा विघ्नेश आत्माराम करंडे वय वर्षं 21 राहणार तूरळ पाचकले वाडी हा MH08/AB4692 पॅशन प्रो दुचाकीने आरवली ते धामणी प्रवास करताना धामणी ते आरवली च्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या MH08/AB4692 बोलेरो वाहन चालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जात दुचाकीला फरफटत नेले. यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला.तर बोलेरो ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या बोलेरो मधील चालक परेश देवरुखकर याच्या पायाला किरकोळ मार लागला असून बोलेरो मधून प्रवास करणाऱ्या तीन वर्षीय रियांश समीर सकपाळ धामणी हिच्या डोळ्याला दुखापत,सिया समीर सकपाळ 26 वर्ष धामणी किरकोळ जखमी तर पल्लवी सीताराम धामणक 24वर्ष याचा हात फॅक्चर झाला आहे.
🔴अपघातात मृत झालेला विघ्नेशला तीन बहिणी असून,तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.वडील सततचे आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो धामणी येथील पेट्रोल पंपावर नोकरीला होता. त्याच्या अपघाताची व मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली व अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
संगमेश्वर पोलिस पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उप निरीक्षक विवेक साळवी, पोलीस कॉनस्टेबल विश्वास बरगाले, चालक सचिन जाधव, खाडे यांनी अपघातस्थळी पोचून पंचनामा करून वरिष्ठाच्या सूचनेनुसार पुढील तपास चालू केला आहे.तर या अपघातात मृत झालेल्या विघ्नेश याचे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

🟥मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप बंदच.- पोर्टल सुरु होण्याची प्रतिक्षा.

मुंबई :- प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. परंतु योजना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पोर्टल अद्याप सुरु झाले नाही. योजनेची घोषणा झाली आहे. मात्र पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे योजनेसाठी शासनाकडून पूर्वतयारी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. ही योजना १ जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे १ जुलैपासून पोर्टल सुरू होणं अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.
🟥या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट सुरवातीला 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमर्यादा 65 वर्षे इतकी करण्यात आली आहे. तसेच जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्याची मुदत 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत बुधवारी (2 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची गर्दी झाली. योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेट्ससाठीचे सर्व्हर स्लो झाले.
🔴मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ वर्ष करण्यात आले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.