आजरा/ मडिलगेत १६ रोजी
स्वामी समर्थ समाधी मठ मूळस्थान अक्कलकोट पादुका दर्शन सोहळा.
आजरा.- प्रतिनिधी.
।। श्री स्वामी समर्थ।।
आजरा/ मडिलगेत, वडकशिवालेत १६ रोजी
स्वामी समर्थ समाधी मठ मूळस्थान अक्कलकोट पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये आजरा येथील
सुर्यकांत नार्वेकर, बाळु जोशी, संतोष डोंगरे, तर वडकशिवालेतील सुभाष बिल्ले यांच्या घरी पादुका दर्शन सोहळा होणार आहे. तर मडिलगे गावातील व परिसरातील सर्व ग्रामस्थांना दि १५ रोजी बुधवारी अक्कलकोट येथुन श्री स्वामी समर्थ समाधी मठ मूळस्थान अक्कलकोट येथुन महाराजांच्या मुळ पादुका अनिकेत कवळेकर यांचे घरी आगमन होईल.दि.१६ गुरुवारी रोजी सकाळी परम स्वामी भक्त श्री चोळाप्पा महाराज यांचे वंशज वेदमूर्ती परम पूज्य श्री नितीन महाराज प्रभाकर पुजारी व ब्रम्हवृंद यांच्या वेदमंत्राने अभिषेक, नैवद्य,आरती संपन्न होईल.व सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेत दिंडीने श्रींची भव्य मिरवणूक स्टँड ते भावेश्वरी मंदिर संपन्न होईल. व पादुका दर्शनासाठी भावेश्वरी मंदिरात ठेवण्यात येतील सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. यांनतर महाआरती व नंतर चुलबंद महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन
श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ मडिलगे यांनी केले आहे.