गडहिंग्लज आजरा रोडवर वनविभाग कार्यालय नजीक चालत्या वाहनावर गव्याची उडी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या नजीकच असणाऱ्या म्हसोबा देवस्थान ते आजरा सूतगिरणी मार्ग दरम्यान चारचाकीवर गव्याने उडी मारल्याने चारचाकी चे मोठे नुकसान झाले आहे. तर चार चाकी मधील युवराज मारुती देशमुख (रा. बुरूडे त्या. आजरा) व रत्नप्रभा प्रकाश कांबळे हे दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देशमुख हे आपली चार चाकी घेऊन गडहिंग्लजच्या दिशेने चालले होते. दरम्यान गाडी म्हसोबा देवस्थानच्या पुढील बाजूस आली असता अचानक रस्ता ओलांडणाऱ्या गव्याने गाडीवर उडी मारली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले तर आत मध्ये असणारे देशमुख व रत्नप्रभा हे जखमी झाले. सदर घटना घडताच आजूबाजूच्या वाहनधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.