Home कोंकण - ठाणे भारत नगरवासियांचा पायाभूत सुविधासाठी आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा ठिय्या आंदोलन.🟥अनधिकृत वाळूच्या डंपरच्या...

भारत नगरवासियांचा पायाभूत सुविधासाठी आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा ठिय्या आंदोलन.🟥अनधिकृत वाळूच्या डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर.( वेंगुर्ला दाभोली येथील सुभाष कुबल यांनी अपघातात गमावला आपला उजवा हात.)🛑पहलगाम हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध .🛑आजरा साखर अध्यक्ष, संचालक मंडळाची खास.- शरदचंद्र पवार यांची भेट. ( इको झोन मधील अडचणीतले मार्ग काढण्याचे नेते श्री. पवार यांनी दिले आश्वासन.)

Oplus_131072

🛑भारत नगरवासियांचा पायाभूत सुविधासाठी आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा ठिय्या आंदोलन.
🟥अनधिकृत वाळूच्या डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर.
( वेंगुर्ला दाभोली येथील सुभाष कुबल यांनी अपघातात गमावला आपला उजवा हात.)
🛑पहलगाम हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध .
🛑आजरा साखर अध्यक्ष, संचालक मंडळाची खास.- शरदचंद्र पवार यांची भेट. ( इको झोन मधील अडचणीतले मार्ग काढण्याचे नेते श्री. पवार यांनी दिले आश्वासन.)

🛑भारत नगरवासियांचा पायाभूत सुविधासाठी आजरा नगरपंचायतीवर धडक मोर्चा ठिय्या आंदोलन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील भारत नगर वासीय आपल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी
मागील चार पाच महिन्यापासून मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत, बांधकाम विभाग आणि वीज मंडळ यांच्याकडे निवेदने देत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या या सुविधांच्या मागणी निवेदनाना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यामुळे संतप्त भारत नगर वासियांनी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून नगर पंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या दारात ठिय्या मांडणार असा पवित्रा भारत नगर वासियांनी घेतला आहे. आजरा नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या भारत नगरला मागील २७ वर्षापासून पायाभूत सुविधा नाहीत. काल परवा झालेल्या कॉलन्या मध्ये डबल विकास होत असताना गेली २७ वर्षापासून भारत नगरला रस्ते, गटारी, पथदिवे यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधासाठी आंदोलने करावी लागत आहेत. प्रशासन प्रत्येक वेळेला तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असून त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत आहे. यासाठी संतप्त भारतनगरवासियांनी मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भारत नगरमध्ये रस्ते करावीत, गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी, खुल्या जागेमध्ये लहान मुलासाठी अंगणवाडी आणि बगीचा करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चामध्ये महिला व बालकांचा समावेश लक्षणीय होता. लहान मुले हातात घोषणा आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

दुपारच्या रणरणत्या उन्हात ही मुले, महिला सायंकाळ पर्यंत ठिय्या मारून बसली होती तेव्हा सायंकाळच्या सुमारास नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी मुलांना घरी पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी मुलांनी धडक उत्तर दिले की, आज आम्ही अर्धा दिवस उन्हात बसल्यावर आपणाला आमची दया आली परंतु मागील कित्येक वर्षापासून आम्ही गुडघाभर चिखलातून शाळेला जातोय त्याची तुम्हाला का काळजी नाही? असे अनेकविध प्रश्न करीत प्रशासनाचा पंचनामा केला. मागील मिटिंगचा अहवाल आणि कामाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही असा पवित्रा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत यांनी घेतला.

त्यामुळे अजूनही ठिय्या आंदोलन सुरु आहे. यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हासंघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर, खुद्बुद्दीन तगारे, तौफिक माणगावकर, गुलाब शिकलगार, यासिन सैय्यद, शगुफ्ता शेख, चांगुणा सुतार, नाजूकबी मुल्ला, मुदस्सर इंचनाळकर, पापा लतीफ, रहीम लतीफ, असिफ काकतिकर, मुफिद काकतिकर, रहुफ नसरदी, रशीद लाडजी, शौकत पठाण, म्हमदू नसरदी, सलीम ढालाईत, संगीता सुतार, रेश्मा काकतिकर, शबाना काकतिकर, रुकैय्या तगारे, सालिया सैय्यद, मुमताज शेख, सानिया माणगावकर, जरीना नसरदी, हिना नाईक, फरजाना नसरदी आदिसह भारत नगरमधील सर्व महिला उपस्थित होते.

🟥अनधिकृत वाळूच्या डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर.
( वेंगुर्ला दाभोली येथील सुभाष कुबल यांनी अपघातात गमावला आपला उजवा हात.)

कुडाळ :- प्रतिनिधी

कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली.सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरीकांच्या सहाय्याने नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास झाला.

शहरातील पोस्ट ऑफीस चौकात रस्ता ओलांडणारे पादचारी सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या डंपर चालक मेलवीन झुजे परेरा (वय 43, रा.मडगाव गोवा) यांच्या ताब्यातील डंपरची धडक बसली. यात कुबल रस्त्यावर पडले, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी त्यांना लागलीच नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची माहीती मिळताच शहरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनींसह नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत, जखमीला उपचारासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यास सहकार्य केले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर पोहेकाॅ. पी.एन.बुथेलो यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार डंपरचालक मेलवीन परेरा याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान कुडाळ शहरातून होणारी बेदरकार डंपर वाहतूक कळीचा मुद्दा बनला आहे.

Oplus_131072

🛑पहलगाम हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध .

आजरा प्रतिनिधी.

Oplus_131072

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.जुम्मा नमाज नंतर एकत्र येत निषेध केला.अनेकांनी हातावर काळ्या पट्ट्या लावून निषेध केला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.कश्मीर मध्ये शांतता निर्माण झाली असताना हा भ्याड हल्ला शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. अशा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी आलम नाईकवाडे, मौलाना अब्दुल रहेमान कांडगांवकर, डॉ.ए.एस.दरवाजकर,अबू पठाण, फैयाज पठाण,रजाक सोनेखान,फारुक नसरदी, हुसेन सोनेखान,जमील निशानदार, मौलाना जकरीया काकतीकर,इजाज काकतीकर, रियाज लमतुरे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
आजरा शहरातील प्रत्येक मशिदी समोर नमाज नंतर एकत्र येत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.

🛑आजरा साखर अध्यक्ष, संचालक मंडळाची खास.- शरदचंद्र पवार यांची भेट. ( इको झोन मधील अडचणीतले मार्ग काढण्याचे नेते श्री. पवार यांनी दिले आश्वासन.)

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी कारखान्याचे संचालक मंडळा समवेत देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रावर सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी कारखान्या समोरील असलेल्या अडचणी बाबत चर्चा झाली. यावेळी गवसे व दर्डेवाडी ही गांवे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत. या बाबत मार्ग काढण्याचे आश्वासन नेते श्री. पवार यांनी दिले.
यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई , जेष्ठ संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, रणजीत देसाई, मा. श्री. अशोक तर्डेकर, रशिद पठाण, दिगंबर देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती व डेप्युटी चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर इत्यादी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.