वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत मडिलगेत साखर वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या मार्फत मडिलगेत साखर वाटप आज दि. २९ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी
सभासदांच्या हस्ते पोती पुजन करून शुभारंभ केला.
यावेळी संचालक दीपक देसाई यांनी साखर वाटप बाबत माहिती दिली की ज्या सभासदांच्या शेअर्स रू.10,000/- व रू. 15,000/- पुर्ण असलेल्या सभासदांना व ऊस पुरवठादारांना तसेच
टनेजची साखर वाटप करण्यात येणार आहे.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांने सन 2024-25 हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला ऊस पुरवठादार शेतक-यांना त्यांनी पुरविलेल्या ऊसानुसार प्रति टन अर्धा किलो प्रमाणे व कारखान्याकडे शेअर्स भागभांडवल रक्कम कम रू.10,000/- ते रु. 15,000/- च्या आतील सभासदांना 25 किलो व रू. 15,000/- पुर्ण भरणा केलेल्या सभासदांना 50 किलो साखर प्रति किलो रू.25/- दराप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाचे सर्व शाखेतून दि.28.04.2025 ते 31.05.2025 अखेर वाटप केली जाणार आहे.
सभासदांना त्यांची साखर वितरण कार्ड घरपोच दिली जाणार असून, सभासदांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सही करून कार्ड वाटप करणेंस येणा-या कर्मचा-यांकडे देवून आपले कार्ड घेणेचे आहे. तसेच ऊस पुरवठादारांनी आपल्या संबंधित संघ शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड/बँक पासबुक झेरॉक्स सही करून संघ शाखेत जमा करून साखर उचल करणेची आहे. अशी माहिती कारखाना व्यवस्थापनांने दिली होती. त्या अनुषंगाने

कारखान्यांने या हंगामात ठरविलेले गळीताचे उद्दिष्ट नैसर्गिक अडचणीमुळे पुर्ण करता आले नांही. या हंगामात अति पावसामुळे सर्वच ठिकाणाचे 25% ऊस उत्पादन घटले त्यामुळे आपल्या कारखान्याचे देखील गळीत कमी झाले असलेंने कारखान्यापुढे आर्थिक अडचणी आहेत त्याच बरोबर शासनाचे धोरणाप्रमाणे व कारखान्याच्या उपविधी प्रमाणे शेअर्सची रक्कम रु.15,000/- पूर्ण असले शिवाय कोणतेही लाभ सभासदांना देणे अडचणीचे असतांना देखील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी मागणी केलेनुसार सभासदांना साखर देणेचे वरील प्रमाणे धोरण ठरविले आहे. त्यानुसार आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे शाखेतून साखर वाटप सुरू होणार आहे.
कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपुरी आहे अश्या सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रू.10,000/- अथवा रु.15,000/- कारखाना कार्यालयात येवून पुर्ण केलेस वरील कालावधीत त्यांनाही साखर देणेचे संचालक मंडळाचे धोरण असून, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. असे आवाहन यावेळी केले.

यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, इजि. जे. एल पोवार, सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच पांडुरंग जाधव, ग्रा. प. सदस्य सुशांत गुरव, जेष्ठ सभासद जानबा ढोकरे, शिवाजी येसणे, पांडुरंग वजरेकर, दिलिप सुर्यवंशी, प्रकाश कडगावकर, सुरेश हासबे, बाबु महागोंडे, सेवा संस्था, श्री राम डेअरी सर्व चेअरमन संचालक मंडळ कारखाना सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. गुरव यांनी आभार मानले.
चौकट
आजरा कारखान्याला..मडिलगेतुन ‘अ’ वर्ग उत्पादक सभासद व ‘ब’ वर्ग असे अंदाजे ८०० सभासद आहेत.. पण यामध्ये टनेजच्या ऊस उत्पादकांना साखर मिळणार आहे तर असे एकूण पात्र लाभार्थी तर शेअर्स रक्कम १०००० व १५००० पूर्ण असणारी ५१ सभासद साखर लाभार्थी आहेत.
