Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र बोरिवली. आजरा एस्. टी बसचा अपघात झाला मात्र गाजावाजा न करता अळी...

बोरिवली. आजरा एस्. टी बसचा अपघात झाला मात्र गाजावाजा न करता अळी मिळी गुपचिळीचा प्रयोग.- प्रवाशांकडून फुटले भांडे( ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेकडे तक्रार )

Oplus_131072

बोरिवली. आजरा एस्. टी बसचा अपघात झाला मात्र गाजावाजा न करता अळी मिळी गुपचिळीचा प्रयोग.- प्रवाशांकडून फुटले भांडे
( ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेकडे तक्रार )

आजरा .- प्रतिनिधी.

बोरिवली. आजरा एस्.टी बसचा अपघात झाला मात्र गाजावाजा न करता अळी मिळी गुपचिळीचा प्रयोग राबविला
दि. २६/४/२०२५ रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान सातारा – कराडच्या मध्ये अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाले.

  1. बऱ्याच जणांना मुक्का मार लागला एका महिलेच्या कपाळावर मोठी जखम झाली रक्त पडू लागले. मात्र जखमी प्रवाशांकडे चौकशी न करता नवीन गाडी किती खराब झाली याकडे ड्रायव्हरचे लक्ष होते. सर्व प्रवासी झोपेत बेसावध असताना अपघात झाला.

वास्तविक जखमी प्रवाशांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. गाडी पहिला ड्रायव्हर व्यवस्थित चालवत होता. मात्र मध्येच ड्रायव्हर बदली झाला व तो झोपेच्या नशेत असावा. त्याच्या हातून गाडी डळमळीत होत असताना एका प्रवाशाने त्यांना सूचना केली. “गाडी दळमळत आहे बाजूला घेऊन थोडी झोप काढा मग पुढे जाऊया” मात्र त्यांनी फक्त तोंडावर पाणी मारून घेतले व पुन्हा गाडी चालवू लागला. वेळ बरी म्हणून मोठा अपघात झाला नाही.

या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी आहे. पहाटेपासून सकाळी सहा पर्यंत प्रवाशांना पुढे पाठवण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. अगर दवाखान्यात नेण्याची तसदी घेतली नाही. सदर एस्.टी एका खाजगी ट्रॅव्हल्सला मागून धडकली व प्रवासी जखमी झाले. डेपो मॅनेजर यांनी पण या अपघाताबाबत गांभीर्याने घेतले नाही अशी तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेकडे आली आहे.


याच गाडीमध्ये गडहिंग्लज ग्राहक पंचायतीचे कार्यकर्त्या रोहिणी चौगुले होत्या. त्यांनी प्रवाशांची पुढे जाण्याची सोय करा अन्यथा तुमच्यावर तक्रार करणार असे सांगतात प्रवाशांना पुढे पाठवण्याचे काम कंडक्टर यांनी केले. प्रवाशांची काळजी न करण्याचा व अपघाताचे गांभीर्य नसणाऱ्या त्या ड्रायव्हरची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कार्यवाही करून केले. कार्यवाहीचा अहवाल माहिती प्रत ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा आजरा यांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदरची माहिती ग्राहक पंचायतीचे आजरा -गडहिंग्लज विभाग प्रमुख व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री गुरव यांनी दिली आहे.

Oplus_131072

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.