Home कोंकण - ठाणे पाकिस्तानचा रस्त्यावर पडलेला ध्वज दुकानात नेऊन ठेवणाऱ्या भाजी विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन.(...

पाकिस्तानचा रस्त्यावर पडलेला ध्वज दुकानात नेऊन ठेवणाऱ्या भाजी विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन.( हिंदू समाज जोरदार आक्रमक, सावंतवाडीतील घटना.)🛑भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग🛑काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेने जाळले पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांचे पोस्टर..मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपिठाचे आजरा अंजुमनच्या कामकाजाला स्थगिती. दिली नाही. असे कोणतेही नोटीस नाही‌ – अध्यक्ष.- आलम नाईकवाडे.

Oplus_131072

🟥पाकिस्तानचा रस्त्यावर पडलेला ध्वज दुकानात नेऊन ठेवणाऱ्या भाजी विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन.
( हिंदू समाज जोरदार आक्रमक, सावंतवाडीतील घटना.)
🛑भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग
🛑काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेने जाळले पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांचे पोस्टर..
मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपिठाचे आजरा अंजुमनच्या कामकाजाला स्थगिती. दिली नाही. असे कोणतेही नोटीस नाही‌ – अध्यक्ष.- आलम नाईकवाडे.

💥पाकिस्तानचा रस्त्यावर पडलेला ध्वज दुकानात नेऊन ठेवणाऱ्या भाजी विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन.

सावंतवाडी :- प्रतिनिधी

काश्मीर पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने सावंतवाडी गांधीचौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता यावेळी गांधीचौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर ठोकला होता.आज सकाळी तो पाकिस्तान चा ध्वज सावंतवाडी शहरातील एका मुस्लिम समाजच्या भाजीविक्रेत्यांने रस्त्यावरून उचलून आपल्या दुकानात नेऊन ठेवला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होते हा सर्व प्रकार हिंदू समाजातील संघटनाना लक्षात येताच हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी एकत्र होत त्या भाजीविक्रेत्याला जाब विचारत चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.याबाबत पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे.

भाजी मंडई मध्ये देखील काही मुस्लिम समाजाचे भाजी विक्रेते गावातून येणाऱ्या गावठी भाजी विक्री करणाऱ्या जेष्ठ महिलांना देखील दादागिरी करत असल्याचे तक्रारी यावेळी हिंदू बांधवाकडे आल्या त्यावेळी अशीच दादागिरी करणाऱ्या त्या मुस्लिम भाजी विक्रेत्याला देखील जाब विचारला आणि अनधिकृत जागेवर बसायचं नाही हिंदू महिला भगिनींना दादागिरी करायची नाही, असा दम भरत त्या विक्रेत्याला देखील उठवले.

असेच काही भाजी विक्रेते दुकानाची आपली जागा आहे असं सांगत जागा अडवून ठेवून दादागिरी करत होते यावर देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून अनधिकृत बसणाऱ्यांना उठवलं पाहिजे अशी मागणी यावेळी हिंदू समाजच्या संघटनानांनी केली.यावेळी सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे,विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर,कृष्णा धुळापनावर,विश्वास घाग,शुभम हिर्लेकर, लादू रायका, संकल्प धारगळकर, हितेन नाईक, गजानन करमळकर,हेमंत बिरोडकर, सागर गावडे, शिवराज राऊत यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग

ठाणे :- प्रतिनिधी.

भिवंडी तालुक्यातील राहणाल ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत कंपाउंडमध्ये असणाऱ्या फर्निचर गोडाऊनला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीच्या भीषण घटनेत फर्निचरची 7 ते 8 गोदाम जळून खाक झाली आहेत. तसेच फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आल्याचेही चित्र आहे.
🟥दरम्यान, या आगीतील धूराचे लोळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरूनही पाहिले जात आहे. आगीच्या आसपास रहीवाशी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाहीये. तर आगीचे कारणही अजूनही अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अजूनही किती वेळ लागेल हे ही सांगता येत नाहीये. तर फर्निचर गोदामाच्या शेजारी कापडाचा मोठा गोदाम असून त्याला ही आग लागण्याची शक्यता बाळवली आहे.

🛑काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेने जाळले पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांचे पोस्टर..

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

Oplus_131072

काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून २८ पर्यटकांच्या हत्या केली. याचा निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली..
यावेळी “जलादो जलादो पाकिस्तान जलादो” “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला..
यावेळी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले की, काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत भारत देशाची सीमा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा या दहशतवादी हल्ल्याने सिद्ध झाले यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अतिरेकी हल्ले झाले आहेत आणि यामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेलेत त्यामुळे त्यामुळे हे केंद्रीय गृहकाचे व गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.


करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात गेली अनेक वर्ष सातत्याने अतिरेक्यांच्या कडून हल्ला होत आहे यावेळी त्यांनी पर्यटकांना लक्ष केले व निष्पाप 28 लोकांचा अत्यंत क्रूरपने गोळ्या झाडून जीव घेतला. त्यामुळे भारत सरकारने भारतीय लष्करातील तिन्ही दलांना खुली सूट देऊन पाकिस्तानला असा धडा शिकवावा की त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्यांना तो लक्षात राहिला पाहिजे व पुन्हा असा भ्याड हल्ला करण्याचे धाडस कुठलाही अतिरेकी करणार नाही व भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे त्यांचे धाडस होणार नाही. यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विजय देवणे, हाजी अस्लम सय्यद सह संपर्कप्रमुख, समन्वयक विक्रम चौगुले, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळोखे, विनोद खोत, शशिभाऊ बिडकर, राजेंद्र पाटील, विशाल देवकुळे, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, दत्ता पाटील, कैलास जाधव, राजू सांगावकर, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, सुरज इंगवले, सचिन नागटिळक, शरद माळी, हर्षल पाटील, दीपक फ्रेमवाला, दीपक अंकल, शिवाजी लोहार, संतोष चौगुले, सुनील चौगुले, सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, वीरेंद्र भोपळे, दत्ता फराकटे,आप्पासो जाधव, महादेव खोचगे, अभिजीत गुरव, बाबुराव पाटील, शांताराम पाटील, अनिल माळी, अजित चव्हाण, अजित पाटील, प्रफुल्ल घोरपडे, इमाम पठाण, उल्फत मुल्ला, अजय प्रभावळे, रजाक शेख, दाऊद तहसीलदार, अभिजीत पाटील, कृष्णात वळकुंजे, अक्षय परीट, धनाजी पाटील, संदीप शेटके, विभुते दाजी आदी उपस्थित होते..

Oplus_131072

🛑मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपिठाचे आजरा अंजुमनच्या कामकाजाला स्थगिती. दिली नाही. असे कोणतेही नोटीस नाही‌- आलम नाईकवाडे.

आजरा – प्रतिनिधी.

आजऱ्यातील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम ही चॅरिटेबल संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हाजी आलम नाईकवाडे यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी बसवराज गुजर यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने उर्दू हायस्कुल व अंजुमन यांचा कार्यभार सोपवला होता.
परंतु याविरोधत इनुस माणगावकर यांनी मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानुसार खंडपिठाने पुढील २४/६/२०२५ पर्यंतची तारीख देत पुढील तारखेपर्यंत चुकीच्या आदेशाच्या आधारे कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ नये असा आदेश दिला.
असल्यामुळे या आदेशाची प्रत जोडून इनूस माणगावकर यांनी आजरा तहसीलदार, आजरा पोलीस, उपसंचालक जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी कोल्हापूर, मुख्याध्यापक उर्दू हायस्कुल आजरा तसेच गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत
.

या निवेदनात म्हटले आहे की, विरोधकांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल करून संस्थेवर कामकाज पाहत आहेत. त्यावर मुंबई हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद येथून त्याच्यावर स्थगिती आदेश आणला आहे.
त्यानुसार सदर संस्थेतील पुढील कामकाज बंद करावे असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी इनूस माणगावकर म्हणाले की, स्कीम मंजुरी घेऊन जो कामकाज ताब्यात घेतला होता त्याला औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली आहे. १९३७ मध्ये रजिस्टर क्रमांक के. बी. १६ ने चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद आहे.

चौकट

वरील विषयाबाबत व दिलेल्या निवेदनाबाबत आलम नाईकवाडे यांनी बोलताना सांगितले – औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली नाही. १९३७ मध्ये रजिस्टर क्रमांक के. बी. १६ ने चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद होती. विरोधक चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद म्हणून दिशाभूल करत आहेत तर ती होती.. आहे नाही..
अशी कोणत्याही प्रकारची स्थगितीची नोटीस आम्हाला आलेली नाही.. विरोधक अपप्रचार करत आहेत. अंजूमन इत्तेहादूल इस्लाम आजरा ही संस्था कोल्हापूर धर्मादाय कडे नसून आता वक्फबोर्ड महामंडळ संभाजीनगर येथे रजिस्टर नं. MSBW/KPR/ १९/२००८ नोंद आहे माझी संचालक मंडळ स्कीम २८/१२/२०२१ ला झाली आहे. व वरील संस्थेत संचलीत डॉ. झाकीरलहूसेन ऑग्लो उर्दू हायस्कूल ऑण्ड ज्युनि. कॉलेज आहे. असल्याचे श्री नाईकवाडे यांनी सांगितले..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.